लोकप्रशासनाचा परिचय

संपूर्ण अभ्यासक्रम

सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा

प्रशासन दोन प्रकारचे – खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन. टाटा, बिर्ला, गुगल किंवा अगदी ओला, उबर सारख्या प्रवासी किंवा ब्लु डार्ट यासारख्या खाजगी कंपन्यांचे प्रशासन म्हणजे खाजगी प्रशासन – Private Administration. मुंबई महानगर पालिकेचे, महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे प्रशासन म्हणजे लोक प्रशासन – Public Administration.

वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचा जनक मानले जाते

वुड्रो विल्सन १९१३ ते १९२१ या काळात अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष. राष्ट्रसंघाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारे, शांततावादी नेते. त्यांना लोकप्रशासनाचे जनक मानले जाते. राजकारण आणि प्रशासन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि लोकप्रशासनाचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. Politics-Administration dichotomy चा वाद होता. काही विचारवंतांच्या मते राज्यशास्त्राअंतर्गत लोकप्रशासनाचा अभ्यास होतो तेवढा पुरेसा आहे. भारतातही आजवर लोकप्रशासनाचा अभ्यास करणारी विद्यापीठे किंवा IIPA सारख्या मोजक्याच संशोधन संस्था आहेत. राज्यशास्त्रांतर्गत प्रशासनाचा अभ्यास केला जातो. १८८७ मध्ये यासंदर्भात लिहीलेला त्यांचा लेख संदर्भामध्ये दिलेला आहे.

संदर्भ

  1. वुड्रो विल्सन यांचा १८८७ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख

Loading

Similar Posts