महाराष्ट्र शासनाची योजना – मुलींना मोफत शिक्षण
राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार
- इतर मागास प्रवर्ग (ओबीसी),
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस),
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी)
- आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा
पात्र विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एका कुटुंबातील दोनच मुलींना याचा लाभ मिळेल.
वर उल्लेखिलेल्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या कार्यालयातून फॉर्म घेऊन आवश्यक त्या दस्तऐवजांसहीत कार्यालयात सादर करावा.
ज्या पात्र मुलींनी शिक्षण शुल्क आधीच भरले असेल त्यांना ते परत करण्यात येईल.
ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी हमी पत्र भरून देणे आवश्यक आहे.
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रवेश पावती
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाख किंवा त्यापेक्षा कमी)
- लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र (कुटुंबातील दोन मुली पात्र)
- मागील वर्षाची गुणपत्रिका
इत्यादी कागदपत्रांसह https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत online अर्ज सुरु झाल्यानंतर तात्काळ सदरचा अर्ज भरायचा आहे.
डॉ. नागेश सूर्यवंशी
प्रभारी प्राचार्य
Scan this QR code to download undertaking – हमीपत्र