स्त्रीवाद
Feminism – स्त्रीवाद
स्त्रीवाद म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या स्त्री आणि पुरुष समान आहेत या विचारांवर विश्वास ठेवणारी विचारप्रणाली. पश्चिमेकडे या विचारप्रणालीची सुरवात झाली परंतु आज हा विचार जगभर पसरलेला आहे. जगभर या विचाराचे समर्थन करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते आहेत.
इतिहास काळात पाश्चिमात्य देशातही चूल आणि मूल हेच स्त्रियांचे मर्यादित विश्व होते. सार्वजनिक जीवन फक्त पुरुषांसाठी राखीव होते. मध्ययुगीन युरोपात स्त्रियांना संपत्ती बाळगण्याचा आणि शिक्षणाचाही हक्क नव्हता. 19 व्या शतकाच्या शेवटापर्यंत फ्रान्स मध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर पडताना डोके झाकून घ्यावे लागत होते आणि जर्मनीच्या काही भागात नवरा आपल्या बायकोला विकू शकत होता. विसाव्या शतकातही युरोपात आणि अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्या सार्वजनिक पदांवर काम करू शकत नव्हत्या. वडील, भाऊ, नवरा, मुलगा किंवा एखादा पुरुष एजंट बरोबर घेतल्याशिवाय त्या कोणताही उद्योग किंवा व्यवसायही करू शकायच्या नाही. विवाहीत स्त्रिला नवऱ्याच्या परवानगीशिवाय आपल्या मुलांवरही नियंत्रण ठेवता येत नव्हते. जगाच्या बऱ्याच भागात आजही या प्रकारची बंधने स्त्रियांवर आहेत.
स्त्रीवाद या शब्दाबद्दल अनेकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे स्त्रीवादी लेखन करणाऱ्या काही स्त्रियाही आपण स्त्रीवादी नाही, असे सांगतात. स्त्रीवाद म्हणजे काय आहे आणि काय नाही, याबद्दलच्या संकल्पना स्पष्ट असल्या तर स्त्रीवादी असल्याचे अभिमानाने सांगता येईल.
१) स्त्रियांचे आंदोलन म्हणजे पुरुषांविरुद्ध सूड उगवणे नाही. स्त्रियांना न्याय हवा आहे; पण अन्यायाचा प्रतिकार अन्यायाने करता येत नाही याची त्यांना जाणीव आहे. एका दमनचक्राचे उत्तर दुसरे दमनचक्र नाही.
२) स्त्रीवाद पुरुषांना दोष देत नाही, तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला दोष देतो. पुरुषसत्ताकामुळे पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे, स्त्री ही खालच्या स्तरावर आहे, आणि स्त्री हे पुरुषाच्या भोगाचे स्थान आहे, अशी शिकवण पुरुषांच्या मनात बिंबवली जाते.
३) दोन वर्ग, दोन देश, दोन जाती, दोन धर्म या लढायांप्रमाणे स्त्री-पुरुष ही लढाई नाही. कारण अशा लढाईत एकाची हार व दुसऱ्याची जीत अपेक्षित नाही. इथे दोघांचे हितसंबंध एकच आहेत. कुटुंबातील सदस्यत्व व मुले यांच्या संबंधाने दोघांची कर्तव्ये सारखीच आहेत. म्हणून सत्तेचे हस्तांतर हा स्त्रीवादात मुद्दाच नाही. उलट, शांततापूर्ण सहअस्तित्व व सामंजस्य अधिक महत्त्वाचे आहे. परस्परांचा सन्मान राखून व समतेच्या पायावर आधारलेल्या नात्याने हे घडू शकते.
४) स्त्रियांना पुरुष व्हायचे नाही. स्त्रियांचे जे जे नैसर्गिक वैशिष्टय़ आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. स्त्रियांवर निसर्गाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्त्रिया नाकारत नाहीत. स्त्रिया व पुरुष यांच्यात शारीरिक भिन्नता असली तरी व्यक्ती म्हणून दोघांत समता नांदू शकते. सुरुवातीला पुरुष हे स्वातंत्र्याचे प्रारूप होते, म्हणून सुरुवातीचा काळ अनुकरणाचा होता.
५) स्त्रीवाद म्हणजे साहित्यातील सवतासुभा वा वेगळी चूल नव्हे. पण साहित्याच्या मुख्य प्रवाहात स्त्रियांच्या साहित्याकडे सतत दुर्लक्ष झाल्यामुळे स्त्रियांच्या साहित्यातील वैशिष्टय़ अधोरेखित करणे, ही स्त्रीवादाची गरज आहे.
६) स्त्रीवाद हा आंदोलनातील वा लेखनातील काही स्त्रियांपुरता मर्यादित नाही. आणि केवळ ‘स्त्रीवादी’ या विशेषणापुरताही सीमित नाही. तळागाळातील स्त्रियांच्या स्तरापर्यंतचा त्याचा विस्तार आहे. स्त्रीवादाला अपेक्षित असलेला भगिनीभाव देश, काल, जाती, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे निर्देश करतो. स्त्रियांचे भावनिक, मानसिक, नैतिक, आर्थिक, भाषिक आणि अस्मितेसंबंधीचे प्रश्न जगात सगळीकडे सारखेच आहेत.
७) स्त्रीवादी म्हणजे कुटुंब मोडणाऱ्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मान्य असणाऱ्या, किंवा स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात नैराश्य आलेल्या स्त्रियांनी अंगीकारलेली विचारसरणी नव्हे. असे मानणे हा स्त्रीवादाचा अपप्रचार आहे. नवे कोणतेही विचार समजून घेण्यातील भीती यामागे आहे. कुटुंब व समाज यातील आपले वर्चस्व कमी होईल अशी भीती पुरुषांना वाटते. स्त्रीवाद हा प्रत्येक स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार करतो. त्यामुळे स्त्रीवाद ही जगातल्या प्रत्येक स्त्रीशी जोडली गेलेली कल्पना आहे असे गांधीजी म्हणत. त्याचप्रमाणे स्त्रीवादी चळवळ हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून, पुरुषांची मानसिकता बदलण्याचा तो प्रयत्न आहे.
८) स्त्रीवादी विचारसरणी फक्त पाश्चात्य नव्हे. खरे तर आपली आजची जीवनशैलीच पाश्चात्त्य आहे. एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारणांचा एक प्रवाह स्त्रियांना ब्रिटिश महिलांप्रमाणे ‘लेडी’ बनवू इच्छिणाऱ्यांचा होता. आता तर जग इतके जवळ आले आहे, की प्रभावी विचारसरणीचे अनुकरण होणे सहज आहे. पण भारतीय संदर्भात हा पूर्णपणे पाश्चात्त्य विचार नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, प्राचार्य गोपाळ कृष्ण आगरकर, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, वि. का. राजवाडे आदींनी शतकापूर्वीपासून स्त्री-पुरुष समता व स्त्रीचे स्वातंत्र्य याबद्दल अतिशय उदारमतवादी विचारांची मांडणी केली आहे. ती आपण आचरणात आणली नाही, एवढेच.
९) स्त्रीवादाच्या कल्पना फक्त शहरी भागापुरत्या मर्यादित नाहीत. भारत हा आजही बहुसंख्य खेडय़ांचा देश आहे. ग्रामीण भागातील गरिबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, जातीची बंधने, परंपरा, चालीरीतींचे अंधानुकरण, अंधश्रद्धा यांच्या प्रभावामुळे स्त्रीवादी विचारसरणी सगळ्या स्त्रियांपर्यंत पोहोचायला अजून काही वर्षे जावी लागतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण मिळाल्यापासून स्त्री-हक्कांबद्दलची जाणीव वाढते आहे. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपल्या आर्थिक सामर्थ्यांची जाण आली आहे. मुलींना शिकवण्याची धडपड दिसून येत आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण आणि लोकसाहित्यातून स्त्रियांनी पुरुषसत्ताकविरोधी मांडणी मोठय़ा प्रमाणावर केली आहे.
साहित्य आणि समाज यांचे संबंध अत्यंत व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे आहेत. कोणत्याही साहित्यकृतीवर ज्याप्रमाणे त्या कालखंडात घडणाऱ्या सामाजिक उलथापालथींचा आणि सामाजिक परंपरेच्या भानाचा परिणाम स्पष्ट दिसतो; त्याचप्रमाणे काही साहित्यकृती समाजातील विकृतींवर नेमकेपणाने प्रहार करून सामाजिक बदलाचे भान देतात. ‘आहे ते जग समताधिष्ठित, स्वस्थ व सुंदर व्हावे’ या सामाजिक जाणिवेतून प्रस्थापित समाजरचनेच्या विरोधात उभे राहून स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या हक्कांची पुनस्र्थापना करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन स्त्रीवादी साहित्य निर्माण झाले आणि त्याने एक नवा क्रांतिकारी इतिहास घडवला.
सन १९७५ हे आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष म्हणून घोषित झाले आणि त्यानंतरचे १९८५ पर्यंतचे दशक हे स्त्रीप्रश्नांना प्राधान्य देणारे ठरवले गेल्यावर स्त्रीमुक्ती चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांसंबंधीचे शतकानुशतके दडपले गेलेले प्रश्न पृष्ठभागावर येऊ लागले. स्त्रीमुक्ती, स्त्री-स्वातंत्र्य, स्त्रीवाद वगैरे पारिभाषिक संकल्पना याच काळात रूढ झाल्या. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम-तिय्यम दर्जाचे स्थान दिल्याने आणि रूढ समाजव्यवस्थेत धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, भाषिक, बौद्धिक अशा सर्व व्यवस्था स्त्रियांचे शोषण करतात याची जाणीव झाल्याने, त्या व्यवस्थेविरोधात बंड करण्याच्या उद्देशाने स्त्रीमुक्ती चळवळ अस्तित्वात आली. स्त्रीचे माणूसपण नाकारून तिला जी पशुतुल्य स्थिती प्राप्त करून दिली जाते, त्याविरुद्ध लढा देत व्यक्ती म्हणून स्त्रीचे असलेले स्थान प्रस्थापित करण्यासाठी विकसित झालेली ‘स्त्रीवाद’ ही एक विचारप्रणाली आहे. स्त्रियांचे क्षमताधिष्ठित हक्क प्राप्त करून समाजपरिवर्तन घडवू बघणारी ही एक राजकीय जाणीव आहे. ‘मानव म्हणजे पुरुष, तर स्त्री हे त्याचे उपांग’ या पारंपरिक विचारसरणीला प्रश्न करत स्त्रीवादी साहित्य घडत गेले आणि स्त्रियांच्या हक्कांचे व अधिकारांचे विविध अंगांनी समर्थन करत त्याचा प्रवास झाला.
मोर्चे, आंदोलने, चळवळी, धरणे, निवेदने, बैठका, सभा, साहित्य, पथनाटय़े, भाषणे, चर्चासत्रे, अधिवेशने, कार्यशाळा, विद्यापीठीय स्त्री-अभ्यास केंद्रे इत्यांदींच्या माध्यमातून स्त्रियांनी पुरुषप्रधान मानसिकतेला जगभर धक्के देत आपले न्याय हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीवादी सिद्धान्ताने कालानुरुप बदल केले आहेत; तसेच धार्मिक समजुती, जातीय परंपरा, व्यक्तीची जडणघडण, मानसिकता, लैंगिकता, शिक्षण, संस्कार यानुसारदेखील स्त्रीवादाचे स्वरूप वरवर बदलते. मात्र, स्त्रीवादाचा गाभा स्त्री- पुरुष समता हाच आहे आणि तो देश-काल यांच्या पलीकडे एकच आहे. स्त्रीवादी विचारसरणीचा जन्म ज्या अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय अन्यायांमुळे झाला; त्यात धर्माने स्त्रियांवर केलेल्या दुजाभावाचा मोठाच प्रभाव आहे.
‘स्त्रीभोवती एक गूढ वलय आहे.. स्त्रियांच्या वर्तनाचं तार्किक स्पष्टीकरण देता येत नाही.. स्त्री ही लहरी आहे.. स्त्री हे कोडे आहे..’ अशा स्वरूपाची विधाने साहित्यिकांपासून मानसशास्त्रज्ञानांपर्यंत आणि बुद्धिवाद्यांपासून तत्त्वज्ञांपर्यंत अनेकांनी केली आहेत. फ्रॉइडलाही स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक गूढ वाटते. ‘स्त्रीला काय हवे आहे, याचे उत्तर माझ्या तीस वर्षांच्या संशोधनानंतरही मी देऊ शकलो नाही, अशी कबुली त्याने दिली आहे. मात्र स्त्री-स्वभावाविषयीचे अस्पष्टीकरणात्मक वर्णन ही पुरुषांची एक खेळी आहे, असे सिमॉन दी बुवाला वाटते. स्त्रीस्वभावाबद्दलचे अज्ञान मान्य न करता गूढ वलय निर्माण करणे, म्हणजे स्त्रीस्वभाव समजून न घेणे आहे. तो कळला, तर पुरुषाचा भ्रमनिरास होईल आणि वास्तव कळून येईल, की स्त्री जशी एकटी आहे, तसा तोही एकटा आहे. स्वत:ची स्वप्ने, आशा-आकांक्षा, भीती, प्रेम, पोकळ गर्व या सर्व बाबतींत तो एकाकी आहे. जोपर्यंत स्त्री समजत नाही, तोपर्यंत तिच्याशी परिपूर्ण संबंध जोडले जाणे अशक्य आहे.
स्त्रीभोवती निर्माण झालेल्या या गूढाचे कारण स्त्रीचे आर्थिक व सामाजिक परावलंबन हेही असू शकते. जसे सर्व परावलंबी लोक आपल्या मालकापासून काही ना काही लपवून ठेवतात, तशी परावलंबी स्त्री पुरुषापासून स्वत:ला लपवून ठेवते. पुरुषाने निर्माण केलेल्या स्वत:च्या मोठेपणाच्या भूमिकेमुळे त्यालाही स्त्री समजून घेणे म्हणजे स्वत:ची दडपशाही मान्य करणे असते. एकाच समान परिस्थितीत स्त्री व पुरुषांच्या प्रतिक्रिया सारख्याच असतात असे मानसशास्त्राला वाटते. त्यात लिंगसापेक्ष फरक पडत नाही. तरी प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन साम्यावर न करता भेदांवर आधारित करण्याची एकूण वृत्ती दिसते. या भेदास सामाजिक घटक कारणीभूत आहेत. पुरुषांच्या हाती सर्व प्रकारची सत्ता आहे. सत्तेमुळे पैसा, श्रेष्ठत्व, पुढारीपण मिळते. दुसऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवता येते. सत्ता म्हणजेच वर्चस्व व स्वामित्व गाजवणे. पुरुष सत्ताधीश आहे आणि स्त्रीकडे काहीही नाही. स्त्रियांच्या अस्तित्वावरच सतत नियंत्रण येत असल्यामुळे अनुभव, भावना, विचार, प्राधान्यकल्पना यांत फरक पडू शकतो. लिंगभेदामुळे पडणाऱ्या फरकांचा स्त्रियांच्या चळवळीने पुनश्च अभ्यास केला. त्यामध्ये पुरुष हाच मापदंड धरून त्यावरून तुलनेने स्त्रीचे मोजमाप करायचे आणि त्यावरून स्त्रीमध्ये असलेला फरक ही तिची कमतरता व कमकुवतपणा मानायचा, हाच व्यवहार मानसशास्त्रात रूढ होता असे त्यांना दिसून आले.
जे जे काही पुरुषांचे आहे ते सर्वोत्कृष्ट आहे; जे स्त्रीचे आहे ते दुय्यम आहे, मुले व मुली यांना कशा रीतीने वाढवले जाते, लैंगिक संबंध, गर्भारपण, पाळी, मुलाचा जन्म हे स्त्रीविशिष्ट अनुभव स्त्रियांना कसे वाटतात, बाई, आई, बायको या वेगवेगळ्या भूमिका निभावताना त्यांचे भावनिक अनुभव काय असतात, बलात्कार, लैंगिक छळ, कौटुंबिक अत्याचार यांचा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, असा स्त्रीनिष्ठ अभ्यास स्त्री- अभ्यासकांनी सुरू केला. हा अभ्यास फक्त स्त्रियांचा न राहता स्त्रियांकडे कसं पाहिलं जातं, ते त्यामुळे समजून आलं. यातून स्त्रीच्या नव्या मानसशास्त्राची गरज निर्माण झाली. स्त्रीचे म्हणून खास अनुभव ती कशी अनुभवते, दंतकथांमधून चितारली जाणारी स्त्रीची प्रतिमा स्त्रियांच्या मानसिकतेवर काय परिणाम करते, गेल्या पन्नास वर्षांत स्त्रीचे जीवन कसे बदलत गेले, स्त्रीच्या जीवनाचे जुने आदर्श त्यांनी कसे धिक्कारले, याचा अभ्यास जसा मानसशास्त्रात नव्याने सुरू झाला; त्याप्रमाणे स्त्रीवादी साहित्यातही या विषयावरच्या समस्यांचे जोरकस चित्रण आले आहे.
अनुक्रमणिका
स्त्रीवादाचा इतिहास
प्राचीन काळ
प्राचीन काळात स्त्रियांनी आपल्यावरील बंधने झुगारून देण्यासाठी काही लढा दिल्याची उदाहरणे फारशी दिसत नाहीत. रोमन साम्राज्यात काही वेळा स्त्रियांनी त्यांच्या विरुद्धच्या कायद्यांसंदर्भात निदर्शने केल्याची उदाहरणे आहेत. रोमनांनी त्याला प्रचंड विरोध केला. एकवेळेस त्यांचे ऐकले की त्या आपल्या डोक्यावर चढून बसतील ही भीती त्यांना होती.
चौदाव्या शतकाच्या शेवटी आणि पंधराव्या शतकाच्या सुरवातीस ख्रिस्तीन डी पिसान या पहिल्या स्त्रीवादी तत्वज्ञ महिलेने फ्रान्स मध्ये स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांबद्दलच्या गैरसमजूतींविरोधात आवाज उठवला.
सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन करणारे बरेच साहित्य प्रसिद्ध झाले होते. स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली तर त्या सहज पुरुषांची बरोबरी करू शकतील असे विचार मांडले गेले. स्त्री विरोधी गटातील लोक स्त्रियांना मूळातच खालच्या दर्जाच्या आणि अनैतिक मानत होते.
सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्त्रीवादी विचार मांडायला सुरवात झाली. ज्यांना लग्न करण्याची इच्छा नाही आणि ज्या धार्मिक नाहीत अशा स्त्रियांनी धर्मनिरपेक्ष कॉन्व्हेंट स्थापन करून स्वतंत्रपणे अभ्यास करावा आणि शिकवावे असेही विचार काही स्त्रीवादी विचारवंतांनी मांडले. परंतु रेनेसॉं च्या काळात मांडलेले हे विचार असंघटीत आणि एकाकीच राहीले.
1688 च्या इंग्लंडमधील वैभवशाली राज्यक्रांतीपासून 1789 मधील फ्रेंच राज्यक्रांती पर्यंत म्हणजेच सतराव्या आणि अठराव्या शतकात प्रबोधनाच्या काळात (Enlightenment) स्वातंत्र्य, समानता आणि नैसर्गीक हक्क स्त्रियांनाही मिळाले पाहिजेत असे विचार युरोपात मांडले गेले. याच काळातील फ्रेंच विचारवंत रुसो स्त्रियांना मूर्ख आणि उथळ प्राणी म्हणाला होता. पुरुषांच्या नियंत्रणाखाली जगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे असे तो मानत होता.
“Declaration of the Rights of Man and of the Citizen” या फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या जगप्रसिद्ध जाहिरनाम्यात स्वातंत्र्य, समानता, बंधुता यावर भर असला तरी स्त्रियांचे हक्क हा विषय दुर्लक्षितच राहीला होता. Olympe de Gouges – ओलाम्प द गूज, या फ्रेच सुधारणावादी लेखिकेने 1791 मध्येच स्त्रियांच्या हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचेच नाही तर त्यांच्या भागीदाराचे स्थान मिळाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
Mary Wollstonecraft’s A Vindication of the Rights of Woman (1792) मेरी वोलस्टनक्राफ्ट यांच्या ए विंडीकेशन ऑफ राईट्स ऑफ वुमन (स्त्रीच्या हक्कांचे समर्थन) या इंग्रजी भाषेतील मौल्यवान स्त्रीवादी ग्रंथाचे प्रकाशन इंग्लंड मध्ये झाले. स्त्रियांचे अस्तित्व केवळ पुरुषांना रिझवण्यासाठीच असते या संकल्पनेला या लेखिकेने आव्हान दिले. स्त्रियांना शिक्षण, राजकारण आणि कामाच्या ठिकाणी समान हक्क मिळाले पाहिजेत अशी मागणी तिने केली. “Women, she wrote, are as naturally rational as men. If they are silly, it is only because society trains them to be irrelevant.” ती म्हणते स्त्रिया नैसर्गीकरित्या पुरुषांइतक्याच बुद्धीसंपन्न असतात आणि तर्कसंगत वर्तन करू शकतात. समाज त्यांना कमी लेखतो आणि असंबद्ध वागायला भाग पाडतो म्हणूनच काही स्त्रिया मूर्ख असल्यासारख्या वर्तन करतात.
याचवेळेस (1783 ते 1888) अमेरिकेत गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध चळवळीला सुरवात झाली. पंधराव्या शतकापासून अंदाजे 1.2 कोटी अफ्रिकन लोकांना जबरदस्तीने उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रात गुलाम म्हणून विकण्यात आले होते. पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्रज, फ्रेंच हे सर्व साम्राज्यवादी यामध्ये सामील होते. गुलामगिरी विरुद्धच्या चळवळीतील स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठीचा लढा देखील चालू केला. त्यांचे युरोपमधील या चळवळीच्या कार्यकर्त्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाले.
मतदानाच्या अधिकारासाठीची चळवळ
या काळापर्यंतची स्त्रीवादी चळवळ मुख्यतः मध्यम आणि उच्च मध्यमवर्गातील स्त्रियांपर्यंत मर्यादीत होती. या चळवळीचा घरकाम किंवा शेतमजुरीची कामे करणाऱ्या असंघटीत स्त्रियांशी काही संबंध नव्हता. सोजोर्नर ट्रुथ नावाच्या गुलामगिरीविरुद्धच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या या प्रतिक्रिया पहा – The single nonwhite woman’s voice heard at this time—that of Sojourner Truth, a former slave—symbolized the distance between the ordinary and the elite. Her famous “Ain’t I a Woman” speech was delivered in 1851 before the Women’s Rights Convention in Akron, Ohio, but Truth did not dedicate her life to women’s rights. Instead, she promoted abolitionism and a land-distribution program for other former slaves. In the speech, Truth remarked, “That man over there says that women need to be helped into carriages, and lifted over ditches, and to have the best place everywhere. Nobody ever helps me into carriages, or over mud-puddles, or gives me any best place! And ain’t I a woman?”
त्यानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये काही कारणांमुळे स्त्रिवादी चळवळ मागे पडली. 1850 पासून पुढे 70 वर्षे स्त्रीवादी चळवळीचा मुख्य विषय मतदानाचा हक्क हाच होता. 1900 च्या दरम्यान अमेरिकेत पूर्व युरोपातून स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. झोपडपट्ट्यांची संख्या वाढली. या संदर्भात काही स्त्रीवादी चळवळीच्या नेत्यांनी वर्ग आणि वंशभेदाच्या आधारावर काही विधाने केली. अमेरिकेत जन्मलेल्या सुशिक्षित मध्यमवर्गीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तर बाहेरून आलेल्या स्थलांतरितांचा प्रभाव कमी होईल त्यामुळे अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी केली.
कामगार वर्ग आणि मध्यमवर्ग यामधील दरी स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात वाढत गेली. कामगार स्त्रियांनी मतदानाच्या अधिकारासाठी आणि संपत्तीमधील वाट्या संबंधी अधिकाराऐवजी कामगार चळवळी मध्ये अधिक लक्ष घातले. याउलट मध्यम आणि उच्चवर्गीय स्त्रियांच्या दृष्टीने मतदानाचा अधिकार हाच सर्वात महत्त्वाचा अधिकार होता.
इमा गोल्डमन या अराजकवादी विचारवंत बाईंनी मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने फारसे काही साध्य होणार नाही हे स्पष्ट केेले. त्यांच्या मते पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त असूनही त्यांच्या मध्ये असमानता कायमच राहीली आहे.
Women would gain their freedom, she said, only
“by refusing the right to anyone over her body…
by refusing to be a servant to God, the state, society, the husband, the family, etc.,
by making her life simpler but deeper and richer.”
Likewise, Charlotte Perkins Gilman, in Women and Economics (1898), insisted that women would not be liberated until they were freed from the “domestic mythology” of home and family that kept them dependent on men.
मतदानाच्या अधिकारासाठीची चळवळ ब्रिटनमध्ये काही प्रमाणात यशस्वी झाली. 1918 मध्ये ब्रिटीश सरकारने स्वतःचे घर असलेल्या स्त्रियांना – गृहीणींना, विवाहीत स्त्रियांना, 30 पेक्षा अधिक वयाच्या विद्यापीठीची पदवी धारण करणाऱ्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. 1920 मध्ये 19 व्या घटनादुरुस्तीने अमेरिकेतील स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. अमेरिकेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यास विरोध करताना स्त्रियांना राजकारणातील वाईट गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे असा आमचा हेतू आहे असे पुरुष नेत्यांचे म्हणणे होते.
मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतरचे युग
मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर युरोप आणि अमेरिकेतील चळवळ थंडावली. मतदानाच्या अधिकारानंतर अधिक काय मिळवले पाहिजे याचा विचार कधी झालाच नव्हता. स्त्रीवादी चळवळीचे अनेक छोट्या गटांमध्ये विभाजन झाले. काहींनी मतदानाच्या अधिकाराची अंमलबजावणी हेच आपले मुख्य उद्दीष्ट मानले. काहींनी महिलांच्या आरोग्याविषयी, बाळंतपणातील सोयींविषयी चळवळी चालू केल्या तर काही गट कामगार स्त्रियांच्या हक्कांसंबंधी लढत होते.
अॅलिस पॉल यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल वुमेन्स पार्टीने सरकारला स्त्री-पुरुष लिंगभेदावर आधारित कायदे करण्यास विरोध करणारी घटनादुरुस्ती करण्याचा आग्रह धरला.
स्त्रीयांना विशेष सवलती देणारे कायदे केल्यास त्यांना नोकरी देणारे टाळाटाळ करतील कारण स्त्रीयांना नोकरीवर ठेवल्यास त्यांच्यासाठी विशेष सोयी कराव्या लागतात, त्याला अधिक खर्च येतो त्यामुळे स्त्रियांऐवजी पुरुषांची नियुक्ती करा असा विचार पुढे येईल.
स्त्रियांना संपूर्ण समानता हवी आहे का विशेष दर्जा आणि संरक्षण हवे आहे याबद्दल दुमत होते. सुरवातीला तरी आपल्या पायावर उभे राहण्यासाठी स्त्रियांना सवलती दिल्या पाहिजेत असे काहीजणांचे मत होते.
स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि त्या पुरुषांप्रमाणेच मतदान करीत आहेत म्हणजे त्या मुक्त झाल्या असा काही जणांचा समज झाला. 1930 ची मंदी आणि नंतरचे दुसरे महायुद्ध यामुळे स्त्रीवादी चळवळ जगभर पुन्हा मागे पडली. युद्धामुळे स्त्रियांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या – पुरुष मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती झाले होते – परंतु युद्धानंतर या संधी पुन्हा कमी झाल्या. स्थिती पूर्ववत झाली.
अमेरिकेत युद्धानंतर सुंदर, शांत घराचे, कुटुंबाचे, साध्य कौटुंबिक जीवनाचे महत्त्व वाढले. उपनगरांमध्ये मोठे घर घ्यायचे, नवरा नोकरी करणार, बायको घर संभाळणार असे चित्र सगळीकडे दिसू लागले. बायकांचे नोकरी करण्याचे प्रमाण आधीपेक्षाही घटले.
स्त्रीवादाची दुसरी लाट – Second wave of feminism
1960 च्या दशकात उपनगरातील शांत जीवनाला तडा गेला. अफ्रिकन – अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांच्या चळवळीमुळे स्त्रियांनाही प्रेरणा मिळाली. व्हिएटनाम युद्धाच्या विरोधी चळवळींमुळेही स्त्रीवादी चळवळीला प्रेरणा मिळाली. गुलामगिरी विरोधी चळवळीमुळे पहिल्या लाटेला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली होती.
1963 च्या समान वेतन कायद्यामुळे एकूण वातावरणात बराच फरक पडला. राष्ट्राध्यक्ष केनडी यांनी 1961 मध्ये सत्तेत आल्यापासून स्त्रियांच्या प्रश्नांविषयी विशेष धोरणे आखायला सुरवात केली. त्यांनी 1961 मध्ये President’s commission on the status of women – स्त्रियांच्या स्थितीविषयक विचार करणारा राष्ट्राध्यक्षांचा आयोग एलिनॉर रुझवेल्ट यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केला. 1963 साली प्रसिद्ध झालेल्या या आयोगाच्या अहवालात विभक्त कुटुंब पद्धतीचे समर्थन करण्यात आले. मूल जन्माला घालण्यासाठी स्त्रीयांची मानसिक तयारी केली पाहिजे असेही त्यांनी नोंदवले. अमेरिकेत नोकरी मिळवण्यासंबंधी स्त्रियांना येणाऱ्या अडचणी, समान वेतन न मिळणे, समान कायदेशीर दर्जा नसणे या गोष्टींचाही विचार केला. लहान मुलांचा संभाळ करण्यासाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची व्यवस्था आणि एकूणच बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष सोयी करण्याची गरजही या आयोगाने मांडली.
1963 मध्ये अमेरिकेत समान वेतन कायदा लागू झाला. 1964 मध्ये नागरी हक्कांचा कायदा संमत झाला. या मध्ये लिंगाच्या आधारावर कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली. काही सुधारणा झाल्या असल्या तरी वर्तमानपत्रात अजूनही नोकरीच्या ठिकाणी स्त्रीयांना दुय्यम स्थान देणाऱ्या जाहीराती येत होत्या आणि स्त्रियांना गर्भनिरोधक साधने वापरायला बंदी असणारे कायदे काही राज्यात होते. बलात्काराची प्रकरणे आणि घरांमध्ये चालणारा हिंसाचार दडपला जात होता.
National Organisation for Women (NOW) या संस्थेने कायदेशीर समानतेचा आग्रह धरला. इतर काही गटांनी शाळा-महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांमध्ये स्त्रीयांचे लेखन समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. विवाहीत स्त्रीच्या नावाच्या मागे Mrs. लावणे बंद करून सर्वांसाठी Ms. ही तटस्थ उपाधी लावावी – या उपाधीचा त्यांच्या वैवाहिक स्थितीशी काही संबंध असणार नाही अशा काही मुद्द्यांचा आग्रह धरण्यात आला. स्त्रीयांसाठी खास दवाखाने उघडण्यात आले. बलात्काराला सामोरे जावे लागलेल्या स्त्रीयांना मानसिक आधार आणि उपचार देण्यासाठी काही समुपदेशन केंद्रे उघडण्यात आली. लहान मुलांच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये आवश्यक तिथे स्त्रीवादाच्या दृष्टीकोनातून बदल करण्यात आले. त्यांच्या विचारात लहानपणापासूनच स्त्रीपुरुष भेदाची भावना निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यासकेंद्रे सुरु करण्यात आली. कामगार कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले. जे कारखानदार किंवा इतर उद्योजक स्त्रीयांविरुद्ध भेदभाव करताना आढळले त्यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला. त्यांना स्त्रीयांना नुकसानभरपाई देण्यास भाग पाडण्यात आले. वैमानिक, बांधकाम क्षेत्रातील कामे, सैनिक, बस चालक, बँकेतील नोकऱ्या स्त्रीयांना मिळू लागल्या.
दुसऱ्या लाटेमध्ये स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाचा सखोल शोध घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासंबंधी सैद्धांतीक चर्चा चालू झाली. पहिल्या लाटेमध्ये हे झाले नव्हते. 1970 मध्ये केट मिलेट यांनी सेक्शुअल पॉलिटीक्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाच्या अजूनही आवृत्त्या निघत आहेत. या पुस्तकामध्ये मिलेट यांनी राजकारण या शब्दाच्या कक्षा रुंदावल्या . वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनातही राजकारण चालते असे त्यांचे म्हणणे होते (Personal is political).
शुलामिथ फायरस्टोन यांनी त्याचवर्षी डायलेक्टिक ऑफ सेक्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. प्रेमाच्या नावाखाली किंवा प्रेमाच्या नाजूक बेड्यांचा वापर करून पुरुष स्त्रीचे शोषण करतात हे त्यांचे प्रमुख प्रतिपादन होते.
जर्मेन ग्रीअर (Germaine Greer) या लंडनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन लेखिकेने The Female Eunuch या आपल्या पुस्तकात लैंगिक शोषणामुळे स्त्रियांची नवनिर्मीती करण्याची इच्छा आणि शक्ती संपवून टाकली जाते असे प्रतिपादन केले. तिच्यामते त्यांना ती शक्ती परत मिळवायची असल्यास स्त्रियांनी स्वतंत्र आणि स्वावलंबी झाले पाहिजे.
एकसंध अशी स्त्रीवादी विचारप्रणाली निर्माण झाली नाही. जे काही प्रयत्न झाले ते विचारांची अतिचिकित्सा करून वैयक्तिक दोषारोप करून हाणून पाडण्यात आले.
स्त्रीवादाचे अनेक प्रवाह निर्माण झाले. युरोप आणि अमेरिकेमध्ये Anarcho feminists – अराज्यवादी स्त्रीवाद लोकप्रिय झाला. कुटुंब, खाजगी संपत्ती आणि राज्याची सत्ता नष्ट केल्याशिवाय स्त्रीया खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाहीत असे विधान इमा गोल्डमन यांनी केले.
Emma Goldman
लेस्बियन म्हणजेच समलिंगी स्त्रीवाद्यांच्या मते निदान काही काळ तरी पुरुषांपासून वेगळे झाल्या शिवाय स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाणार नाही.
वेगवेगळ्या प्रकारच्या विचारमंथनातून शेवटी तीन मुख्य प्रवाह प्रभावी ठरले – उदारमतवादी स्त्रीवाद – हाच मुख्य प्रवाह ठरला होता. त्यांनी स्त्रीयांना सत्तेमध्ये समान वाटा, कामाच्या ठिकाणी सवलती या बाबींची मागणी केली. रॅडिकल फेमिनिस्ट्स (Radical feminism) हा दुसरा प्रमुख प्रवाह. यांना समाजाची सध्या असलेली पुरुषसत्ताक रचना मूळातून बदलायची होती. मोठ्या क्रांतीशिवाय स्त्रियांची स्थिती सुधारणार नाही असे त्यांचे मत होते. सांस्कृतिक स्त्रीवाद या तिसऱ्या प्रवाहाने स्त्रियांच्या वेगळेपणावर भर दिला. त्यांच्यामते स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जिव्हाळ्याचे संबंध जपतात. मुले वाढवण्यामध्ये त्यांना निसर्गतः अधिक रस असतो. स्त्रियांनी पुरुषांच्या भूमिका पार पाडणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्त्रियांनी आपले वेगळेपण जपले पाहिजे.
स्त्रीवादाचे जागतिकीकरण
20 व्या शतकाच्या शेवटी स्त्रीवाद जगभर पसरला. युरोप-अमेरिकेतील स्त्रीवाद्यांनी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमधील स्त्रीवादी चळवळींबरोबर आपले संबंध वाढवले. बुरखा वापरण्याची सक्ती, विवाहाची जबरदस्ती, नवजात मुलींना मारून टाकणे, विधवांना जाळणे, Female Genital Mutilation – FMG – स्त्रीच्या जननेंद्रियाचे विद्रुपीकरण हे या भागातील स्त्रियांचे प्रश्न पाहून युरोपियन आणि अमेरिकन स्त्रियांना मोठा धक्का बसला. त्यांनी स्वतःला या स्त्रियांचे मुक्तीदाते समजायला सुरवात केली. त्यांना प्रत्यक्ष परिस्थिती नीट समजली नव्हती. त्यांच्या विचारांनी आणि मार्गांनी तिसऱ्या जगातील प्रश्न सुटणार नाहीत याची त्यांना जाणिव झाली नव्हती.
आफ्रिकेमध्ये तर युरोपियन वसाहतवाद्यांच्या आक्रमणानंतर तिथल्या स्त्रियांची परिस्थिती अधिक खालावली.
1975 साल हे संयुक्त राष्ट्रांनी जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केले. 1976 ते 1985 हे जागतिक महिला दशक म्हणून घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांनी 1975 मेक्सिको सिटी, मेक्सिको, 1980 कोपनहेगन, डेन्मार्क, 1985 नैरोबी, केनिया आणि 1995 बिजींग, चीन अशा चार जागतिक महिला परिषदा आयोजित केल्या.
1975 पासूनच्या जागतिक महिला परिषदांमध्ये विकसित आणि विकसनशील देशातील महिलांमधील वाद वाढत गेले.
कोपनहेगनच्या परिषदेत पडदा आणि एफ. एम. जी. हे मुख्य चर्चेचे विषय ठरवण्यात आले. ते आम्हाला न विचारताच ठरवले असे आफ्रिकेतील महिलांचे म्हणणे होते. स्त्रियांनी गर्भनिरोधक वापरले पाहिजेत, त्यांना त्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या विषयावर चर्चा झाल्या. तिसऱ्या जगातील स्त्रियांच्या म्हणण्यानुसार त्यांची उपाशी मरणारी बालके हा त्यांचा मुख्य प्रश्न होता.
तिसऱ्या जगातील जन्मदर कमी झाला पाहिजे म्हणजे जगातील संसाधनांवर आलेला ताण कमी होईल असे युरोप अमेरिकेतील स्त्रियांचे मत होते. प्रत्यक्षात पाश्चिमात्य जगातील देश नैसर्गीक संसाधने अधिक प्रमाणात वापरतात.
स्त्रीवादाची तिसरी लाट
इ.स १९९० नंतर स्त्रीवादी चळवळीचा तिसरा टप्पा सुरू होतो. वसाहतवाद आणि साम्यवाद यांचा शेवट आणि मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात अशा काळात स्त्रीवाद विषयक नवीन दृष्टीकोन विकसित झाला. या काळात स्त्री स्वातंत्र्य किंवा स्त्रीमुक्ती या संज्ञांचा अर्थ व्यक्तीसापेक्ष आणि स्थलसापेक्ष असावा असा विचार पुढे आला. प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वातंत्र्याची व्याख्या करण्याची मुभा असावी. कारण ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ या संकल्पना सापेक्ष आहेत. प्रगत पाश्चात्य देशाप्रमाणे आशिया आणि आफ्रिका खंडातील स्त्रीयांना देखील त्या-त्या समाजातील परिस्थितीनुसार पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, वर्णभेद पिडीत स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध जागृती निर्माण झाली आणि त्याच्यावरील अन्यायाला स्त्रीवादाने वाचा फोडली. त्याचप्रमाणे समलिंगी संबंधांना (स्त्री-स्त्री यांच्यातील लैंगिक संबंध) लोकमान्यता मिळावी यासाठी प्रत्यन झाले.
विसाव्या शतकाच्या शेवटी आणि 21 व्या शतकाच्या सुरवातीला अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीमुळे स्त्रीवादाची मोठीच पिछेहाट झाली.
स्त्रीवादाची चौथी लाट
चौथी लाट 2012 पासून सुरु झाली असे मानले जाते. समाज माध्यमांचा (social media) वाढता वापर हे या लाटेचे वैशिष्ट्य आहे. लैंगिक छळ, एखाद्याच्या शरीराच्या स्वरुपावरून त्याची चेष्टा करणे (body shaming), बलात्काराचे वाढते प्रमाण हे विषय मुख्यतः चर्चेमध्ये आले. डिसेंबर 2012 मध्ये भारतात निर्भया कांड झाले. 2006 मध्ये मी टू चळवळीला सुरवात झाली. 2017 मध्ये हार्वे विन्स्टिन केस नंतर ही चळवळ अधिक वेगात जगभर पसरली. #MeToo हा हॅशटॅग वापरून तुम्ही समाज माध्यमांमध्ये याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.
Simone de Beauvoir’s popular quotes – from The Guardian
“Man is defined as a human being and woman as a female – whenever she behaves as a human being she is said to imitate the male.”
“One is not born, but rather becomes a woman.”
“Few tasks are more like the torture of Sisyphus than housework, with its endless repetition: the clean becomes soiled, the soiled is made clean, over and over, day after day. The housewife wears herself out marking time: she makes nothing, simply perpetuates the present … Eating, sleeping, cleaning – the years no longer rise up towards heaven, they lie spread out ahead, grey and identical. The battle against dust and dirt is never won.”
“All oppression creates a state of war; this is no exception.”
“One’s life has value so long as one attributes value to the life of others, by means of love, friendship, indignation, compassion.”
“In itself, homosexuality is as limiting as heterosexuality: the ideal should be to be capable of loving a woman or a man; either, a human being, without feeling fear, restraint, or obligation.”
“To emancipate woman is to refuse to confine her to the relations she bears to man, not to deny them to her; let her have her independent existence and she will continue nonetheless to exist for him also: mutually recognising each other as subject, each will yet remain for the other an other. The reciprocity of their relations will not do away with the miracles – desire, possession, love, dream, adventure – worked by the division of human beings into two separate categories; and the words that move us – giving, conquering, uniting – will not lose their meaning. On the contrary, when we abolish the slavery of half of humanity, together with the whole system of hypocrisy that it implies, then the ‘division’ of humanity will reveal its genuine significance and the human couple will find its true form.”
“Self-knowledge is no guarantee of happiness, but it is on the side of happiness and can supply the courage to fight for it.”
“On the day when it will be possible for woman to love not in her weakness but in strength, not to escape herself but to find herself, not to abase herself but to assert herself – on that day love will become for her, as for man, a source of life and not of mortal danger. In the meantime, love represents in its most touching form the curse that lies heavily upon woman confined in the feminine universe, woman mutilated, insufficient unto herself.”
“Each of us is responsible for everything and to every human being.”